Ladki Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे, आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ७६ हजार ०९१ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ३० हजार ७८४ अर्ज पात्र झाले आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट पाहूया.
1) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे येथे झालेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात दिली.
3) यानंतर म्हणजेच दिनांक 17 ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी 3 महिन्यांचे 4,500 रूपये दिले जाणार आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाडणे, ता.साक्री महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिंनीना आश्वस्त केले.
येथे पाहता येणार लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी
लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी येथे होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे संपन्न होणार आहे. यासंदर्भात नुकतीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी बालेवाडी स्टेडियम येथे कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तालय, पुणे येथे बैठक घेऊन महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
तसेच आता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रायोगिक चाचणीही घेण्यात आली असून, महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजना