Ladki Bahin Yojana Next Payment : महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू असून, सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. नवीन सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या. ‘लाडकी बहीण’ साठी 1400 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
त्यामुळे आता Ladki Bahin Yojana Next Payment लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ladki Bahin Yojana Next Payment : महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत २.३४ कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत ७,५०० रुपये आधीच देण्यात आले आहेत. महायुतीने ही मदत मासिक १५०० रुपयांवरून मासिक मदत २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल. त्यामुळे आता लवकरच Ladki Bahin Yojana Next Payment लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र अध्याप Ladki Bahin Yojana Installment Date जाहीर करण्यात आलेली नाही.
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा
लाडकी बहीण योजनेचे सुधारित निकष अपडेट येथे पाहा
13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…