Ladki Bahin Yojana List : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अधिवेशनात ३३७७८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या असून, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले असून, आता जानेवारी 2025 या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या लेखामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती आणि Ladki Bahin Yojana Beneficiary List ऑनलाईन किंवा ऑफलाईन यादी कोठे आणि कशी पाहायची याची माहिती पाहूया.
लाडक्या बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक कराल ते जाणून घ्या.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपये
महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. किती मिळणार लाभ येथे पाहा
लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल झाला आहे का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजना यादी ऑनलाईन येथे पाहा
लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर लाभार्थी यादी वर क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका निवडून आवश्यक माहिती सिलेक्ट करून यादीत नाव पाहता येईल.
किंवा अर्जदार लॉगिन करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. याव्यतिरिक्त दूसरा पर्याय खाली दिलेला आहे.
- तुम्ही जर Nari Shakti Doot App वरुन ऑनलाईन अर्ज केला असेल तर नारी शक्ती दूत नावाचे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
- सुरुवातीला हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल, त्यानंतर या ॲपमध्ये मी केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या अर्जापुढे Approved असे लिहून येईल. किंवा तुमचा अर्ज Pending मध्ये देखील असू शकतो.
- जर तुमचा अर्ज Pending मध्ये असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.
- परंतु जर तुमचा अर्ज Disapproved झाला तर मात्र तुम्हाला अर्ज पुन्हा भरावा लागेल.
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडक्या बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव असे चेक करा
- Step 1: तुमच्या मोबाईल मध्ये Narishakti Doot App उघडा आणि लॉगिन करा.
- Step 2: डॅशबोर्डमध्ये “लाभार्थी अर्जदारांची यादी” (Ladki Bahin Yojana Beneficiary List) या बटणावर क्लिक करा.
- Step 3: त्यानंतर आपले गाव, ब्लॉक, तालुका, आणि जिल्हा निवडा आणि “शोथा” बटणावर क्लिक करा.
- Step 4 : तुम्हाला तेथे दिसेल तुमचं नाव यादीत आहे की नाही.
केंद्र सरकारकडून महिलांसाठी दरमहा 7000 रुपये विद्यावेतन देणारी योजना – येथे पाहा
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित