‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा

Ladki Bahin Yojana Latest New Update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे. या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे दोन अपडेट पाहूया..

महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात (Ladki Bahin Yojana Beneficiaries) 1 रुपये जमा करण्यात येत आहे, याबाबत महत्वाची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana : या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा करण्यात येत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी आता नवीन वेबसाइट – येथे क्लिक करा

1 रुपया हा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग

जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

राज्यातील ‘7’ लोकप्रिय सरकारी योजना

मंत्री तटकरे म्हणाल्या की, “या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

कर्मचारी अपडेट : अंगणवाडी कर्मचारी | NHM कर्मचारी | कंत्राटी कर्मचारी | आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत (Majhi Ladki Bahin Applications)

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतू ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत.

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागणार नाही

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Comment