Ladki Bahin Yojana Applications Verifie : लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात नुकताच ऑक्टोबर, नोव्हेंबरचा आणि डिसेंबर हप्ता जमा करण्यात आला असून, आता यापुढे Ladki Bahin योजनेच्या काही लाभार्थ्यांच्या अर्जाची क्रॉस चेकिंग म्हणजेच अर्ज पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मिडियाशी बोलताना दिली, नेमके कोणते अर्ज बाद होणार? आणि कोणत्या अर्जाची पडताळणी केली जाणार? सविस्तर वाचा
लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. – महिला व बालविकास मंत्री
सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी (Ladki Bahin Yojana Applications Verifie) होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या म्हणाल्या की, “तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. याबाबत 5 प्रकारचे निकष याबाबत ठेवण्यात आले आहे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असेल, म्हणजेच ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला लाभार्थी
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असलेल्या महिला लाभार्थी
- आंतरराज्य विवाह केलेल्या महिला लाभार्थी
- आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल त्या महिला लाभार्थी
- एकच महिलेने दोन अर्ज केले असल्यास
त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणारे लाभार्थी आता यामधून बाद होणार आहे, मात्र जे लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र आहेत, त्यांना योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेचे सुधारित निकष कोणते आहे? येथे पाहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
या पात्र लाभार्थी महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे
आधार कार्ड सारखेच आणखी एक नवीन Unique ID Card येणार, कोणाला मिळणार?
लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन टप्प्यात
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन टप्प्यात जमा झाले असून, पहिल्या टप्प्यात आधार सिंडीग राहिलेल्या सुमारे १२ लाख ८७ हजार ५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७ लाख ९२ हजार २९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा (Majhi Ladki Bahin Yojana) हप्ता सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.