Ladki Bahin Yojana Amount : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे, अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.
या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही.
लाभार्थी महिलांकडून (Ladki Bahin Yojana Amount) रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री. यादव यांनी केले आहे.
महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता येथे चेक करा
एसटी बसचे भाडे वाढण्यामागे काय कारण? या तारखेपासून भाडेवाढ लागू
आदरणीय सर मी जेव्हा लाड़की बहिन फॉर्म भरला तेव्हा स्थायी नौकरी नाही होती.पन आता लागली असल्यामुडे पुढील लाभ मला नाही पाहिजे. तरी माझी विनंती मान्य करण्यात वावी.