Ladki Bahin Removal List : महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण“ योजनेसाठी पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची अधिकृत माहिती दिली आहे. 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी गेल्या काही दिवसापासून सुरु होती. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असेल, म्हणजेच ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला लाभार्थी,
ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असलेल्या महिला लाभार्थी, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला लाभार्थी, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल त्या महिला लाभार्थी, एकच महिलेने दोन अर्ज केले असल्यास असे लाभार्थी, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल असे लाभार्थी अर्जाची छाननी 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार केली असता, आता खालील लाभार्थी हे अपात्र झाले आहेत.
🔹 कोणत्या महिलांना अपात्र ठरविण्यात आले?
🚫 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – 2,30,000
🚫 वय 65 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
🚫 कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000
➡️ एकूण अपात्र महिलांची संख्या – 5,00,000
सरकारचा मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेतील अपात्र 5 लाख महिलांना मिळालेला आर्थिक लाभ सुरक्षित!
अंगणवाडी भरती संदर्भात मोठी अपडेट येथे पाहा
🔹 पात्र महिलांसाठी चांगली बातमी!
✅ सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार!
✅ राज्य सरकारने योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्यासाठी 5 प्रकारचे निकष येथे पाहा
28 जून 2024 रोजीचा शासन निर्णय तसेच 3 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय येथे पाहा
📢 योजनेबाबत अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या:
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीच्या नियमांत मोठे बदल – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा!