Ladki Bahin District Wise : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे.
ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्यातील काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर 1 रुपया रक्कम जमा करण्यात आला. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लाडक्या बहीण योजनेची यादी पाहा
लाडकी बहीण योजनेची जिल्हावार माहिती पाहा
महायुती सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) या महत्वाकांशी योजनेला महाराष्ट्रातील माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत 1 कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरु असुन, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 अर्ज पात्र झाले आहे. याबाबत जिल्हावार माहिती खालील प्रमाणे आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा