राज्यातून सर्वात प्रथम ‘लाडका भाऊ’ योजनेचे ठरले ‘हे’ 10 मानकरी; या योजनेच्या लाभासाठी ‘येथे’ करा त्वरित अर्ज

Ladka Bhau Yojana Online Apply : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात लाडका भाऊ (Ladka Bhau Yojana) योजने अंतर्गत खाजगी उद्योजकांकडून राज्यात प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दहा उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. तुम्ही ही लाडका भाऊ या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (Ladka Bhau) या योजनेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारास त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे म्हणजे 12 वी पास रू.6000/- आयटीआय डिप्लोमा रू 8000/- आणि पदवीधर इंजीनियरिंग साठी रू 10000/- इतके विद्यावेतन 6 महिन्यांसाठी शासनाकडून मिळणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ईबिक्सकॅश ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (EBIXCASH GLOBAL SERVICES PVT. LTD) या खाजगी आस्थापनेने कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate) हिंदी आणि इंग्रजी या पदाकरीता खाजगी आस्थापनेतून महाराष्ट्रातून प्रथमच 10 प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करून नियुक्ती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यामध्ये स्नेहा बिडलांग, प्रविण शिंदे, तेजस्वी बनकर, फहाद खान, जितेंद्र यादव, रचना कांबळे, अक्षदा कांबळे, सुभाष अवघडे, शिवम पांडे, श्याम शिंदे या उमेदवाराची निवड झालेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थीची निवड करणारी ही महाराष्ट्रातील पहिली खाजगी आस्थापना ठरली आहे.

सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज, ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा

रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 7934 पदांची भरती जाहीर

या अधिकृत वेबसाईटवर करा अर्ज | Ladka Bhau Yojana Online Apply

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका तसेच खाजगी आस्थापना, उद्योजक, सेवा क्षेत्रातील उद्योजक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी www.mahaswayam.gov.in या विभागाच्या वेबसाईटवर करून मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.

योजनेची संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक येथे पाहा

Leave a Comment