लाडका भाऊ योजना : पात्र बहिणींनाही संधी मिळणार, लाडका भाऊ योजनेत ‘इतके’ मिळणार विद्यावेतन

Ladka Bhau Yojana : राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी 5 टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले, लाडका भाऊ (Ladka Bhau) म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र बहिणींना (Ladki Bhahin) संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लाडका भाऊ योजनेत ‘इतके’ विद्यावेतन मिळणार

Ladka Bhau Yojana उमेदवारांना सरकारकडून शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार रुपये, आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असे विद्यावेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योगांसह, सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था याठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिणार्थींना संधी मिळणार आहे, त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून, त्या-त्या जिल्ह्यांमध्ये प्रशिणार्थींना लगेच संधी उपलब्ध करून देता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा

यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन (Ladka Bhau Yojana Online Apply) या दोन्ही पद्धतींने नोंदणी करण्यात यावी. जिल्हा रोजगार कार्यालये, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लाडका भाऊ योजनेसाठी येथे ऑनलाईन अर्ज करा

‘लाडकी बहीण योजने’साठी ‘6’ महत्वाचे बदल येथे पाहा

लाडका भाऊ योजनेअंतर्गत या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली जाणार

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासह महानगरपालिका, नगरपालिका विविध शासकीय कार्यालयात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेसह प्रशिक्षणार्थी म्हणून संधी दिली जाणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, संबधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय राखून प्रयत्न करावेत. अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या.

तसेच राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र यांपासून ते सिडको, एमएसआरडीसी यांच्यासारख्या स्वतंत्र प्राधिकरणांपासून ते सर्वच ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संधी देता येणार आहे. त्यासाठी या सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

मुलीसाठी मोफत शिक्षण : उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा

Leave a Comment