Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या सोशल मीडिया मध्ये सुरू असलेल्या पोस्ट मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे, मात्र आता यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये असे आवाहन केले असून,यासंदर्भात नेमके प्रकरण काय आहे? याबाबतची माहिती दिली आहे. सविस्तर वाचा

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात X या ट्वीटरवर माहिती देताना म्हंटले आहे की, धुळ्यातील श्रीमती भिकुबाई प्रकाश खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Majhi Ladaki Bahin Yojana) मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करणेबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे.

लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? तारीख पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार

तथापि, या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून, अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती.अश्याप्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरु नाही.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर

महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग कटिबध्द आहे.

मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिणयोजना

लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही; निकष पहा

Leave a Comment