कनिष्ठ लेखापाल भरती 2025 – सरकारी नोकरीची मोठी संधी! त्वरित अर्ज Junior Accountant

Junior Accountant : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागात (Junior Accountant) पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. यांतर्गत कोकण, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरतीसंबंधी संपूर्ण माहिती

लेखा व कोषागारे विभाग, महाराष्ट्र शासन

  • एकूण जागा : 414
  • पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल
  • वेतनश्रेणी : ₹29,200 – ₹92,300 (S-10 स्तर)
  • कोकण विभाग : 179 जागा
  • अमरावती विभाग : 45 जागा
  • नागपूर विभाग : 56 जागा
  • नाशिक विभाग : 59 जागा
  • पुणे विभाग : 75 जागा
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम तारीख: विभाग निहाय वेगवेगळी आहे. मूळ जाहिरात पाहावी.

स्टाफ नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • वित्त विभाग, शासन अधिसूचना क्रमांक सेवाप्र-२०२३/प्र.क्र.०६/कोषा (प्रशा-३), दि. ९.०९.२०२४ नुसार “कनिष्ठ लेखापाल”, गट-क (सेवाप्रवेश) नियम, २०२४ विहित करण्यात आले असून नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीकरीता खालील अर्हता धारण करणे आवश्यक राहील.
  • अ. ज्यांनी पदवी धारण केली आहे; (पदवी याचा अर्थ, सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता)
  • ब. तांत्रिक अर्हता – ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
  • संगणक अहर्ता (MSCIT)
  • सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

कोकण विभाग मूळ जाहिरात येथे पाहा

अमरावती विभाग मूळ जाहिरात येथे पाहा

नागपूर विभाग मूळ जाहिरात येथे पाहा

नाशिक विभाग मूळ जाहिरात येथे पाहा

पुणे विभाग मूळ जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट : https://mahakosh.maharashtra.gov.in/

BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती! 

सरकारी नोकरीची संधी! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती!

Leave a Comment