Jagtik Divyang Din Ghosh Vakya : जागतिक दिव्यांग (अपंग) दिन दरवर्षी दिनांक ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला, तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभ पणे पोहचवण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे.
राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांची पदनिर्मिती – शासन निर्णय पाहा
समाजाला आपल्या या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस होय. आपण जे करू शकतो ते सर्व काही दिव्यांग बांधव देखील करू शकतात. म्हणूनच त्यांना सहानभूती नाही तर आपुलकीची गरज आहे. अपंग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्वाचे आहे.
जागतिक दिव्यांग (अपंग) दिन 3 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो?
दिनांक ३ डिसेंबर रोजी जगभरामध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य (World Disability Day Slogan) पुढे दिलेली आहे.
मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर
हक्क देऊ, संधी देऊ,
दिव्यांगाना प्रोत्साहन देऊ.
दिव्यांगाना देऊ संधी,
वाहील विकासाची नांदी.
सर्वांचा निर्धार,
दिव्यांगाचा स्विकार.
मिळून सारे ग्वाही देऊ,
दिव्यांगाना सक्षम बनवू.
दिव्यांगाचा सन्मान,
हाच आमचा अभिमान.
तुमचा आमचा एकच नारा,
दिव्यांगाना देऊ सहारा.
ऊठ दिव्यांग जागा हो,
समाजाचा धागा हो.
समाजाला जागवू या,
दिव्यांगाना सक्षम बनवूया.
दिव्यांगांसाठी कार्यरत कंत्राटी शिक्षकांचे शासन सेवेत समायोजन – येथे पाहा
एकासारखं दुसर नसतं सर्वांना बरोबर घ्यायचं असतं !
दिव्यांग असो, वा अपंग सगळ्यांनाच पुढे न्यायचं असतं..!
नको बोल सहानुभूतीचे,
शिक्षण द्या दिव्यांगाना हक्काचे..!
दिव्यांगाना समान संधी,
हिच प्रगतीची नांदी…!
सामावेशित शिक्षण आले दारी,
विशेष मुलांची प्रगती भारी.
समग्र शिक्षा अभियानाची निर्मिती,
सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांगांची उन्नती !
हातात हात द्या,
विशेष मुलांना साथ द्या.
समाजाला जागवू या,
दिव्यांगांना सक्षम बनवूया.
दया नको संधी द्या !
विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना सामावून घ्या.
डरने की क्या बात है।
हम दिव्यांग के साथ है !
दिव्यांगाचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण.
मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर
समावेशित शिक्षण,
दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण.
दिव्यांगाना शिकवू,
समाजात त्यांना टिकवू.
एकमेकांच्या सहकार्यने एकत्र येणार,
दिव्यांगाचे निश्चित कल्याण होणार.
निरक्षरता निर्मूलनाचा एकच उपाय,
सर्वांच्या शिक्षणाशिवाय नाही पर्याय.
दिव्यांगाना साथ दया,
मदतीचा हात द्या.
लगंडा पांगळा म्हणु नका.
दिव्यांगाना हिनवू नका.
एक-दोन-तीन-चार, दिव्यांग म्हणजे नाही भार,
पाच-सहा-सात-आठ, अपंगांना दाखवा वाट.
अ-आई, ब-बाबा,
अपंग सुदधा मिळवतात शिक्षणावर ताबा.
शिक्षणाचा कायदा,
दिव्यांगाच्या शिक्षणाचा वायदा.
शिक्षणाचा अधिकार,
दिव्यांगाचा स्वीकार.
आता मनाशी ठरवा पक्कं,
शिक्षण दिव्यांगाचाही हक्क.
दिव्यांगाचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण.
सोडून देऊया वाईट अंधश्रद्धा चालीरीती,
दिव्यांगाच्या शिक्षणाला देऊया गती.
दिव्यांगाना देऊ समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
दिव्यांग मित्रांना सहानुभूती नव्हे,
विश्वास दाखवा.
दिव्यांग बांधवांना सन्मानाचा, समानतेचा हक्क देऊया,
चला, एक समतोल समाज घडवूया..
सहानुभूती नको,
आपुलकी दाखवा.
सहानुभूती नवे विश्वास देऊया,
प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ देऊया.
सहानुभूती नको,
सहकार्य आणि आधार द्या.
मदतीसोबत संधीचा हात ठेवूया,
दिव्यांग बांधवांसाठी सन्मानाचे स्थान ठेवूया.
बोलता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘वाचा’ आहे नां !
ऐकता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘जाणीव’ आहे नां !
दिसत नसलं म्हणून काय झालं,
मला ही ‘स्पर्श’ आहे नां!
बुध्दि नसली म्हणून काय झालं,
मला ही ‘समज’ आहे नां !
चालता येत नसलं म्हणून काय झालं,
माझ्यातही ‘हिम्मत’ आहे नां !
दिव्यांग असलो म्हणून काय झालं,
‘मी’ ही एक ‘माणूसचं’ आहे नां..
देऊनी त्यांना समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
समाजातील अंध, मुके, बहिरे, किंवा इतर व्यंग असलेल्या व्यक्तींना सहानुभूती नको तर विश्वास दाखवा. त्यांना परावलंबी जीवन नको तर स्वावलंबी बनवायचे आहे. चला तर मग मदतीचा हात व साथ देऊ या.
Jagtik Divyang Din Ghosh Vakya
मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर
समावेशन
शाळेत जाता नाते जडते।
पुस्तकावीण सारेच घडते ।
ज्ञानाचे, प्रगतीचे, भांडार उघडते ।।
विद्यादानाचे समाधान मिळते ।
सर्व समावेशनाने दिव्यांगाचे शिक्षण होते ।।
त्यामुळे भावापिढीचे भविष्य घडते ।
म्हणूनची सर्व समावेशाचेच महत्व कळते ।
नव्या युगाला नव्या पिढीला
नव्या शतकाचे व्दार उघडते ।
सर्वांच्या उत्तम सहकार्याने
शिक्षणाचे नवे पर्व सुरू होते ।
सर्व दिव्यांगाचे उत्तम शिक्षणात समावेशन होते।।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…