Independent Disability University : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण (Higher Education) घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ (Independent Disability University) स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15 ऑगस्टपर्यत अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा,असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
दिव्यांग विद्यापीठ निर्मितीसंदर्भात मंत्री उच्च व तंत्रशिक्षण श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकार, अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी शिक्षणासाठी विशेष शिक्षकांचा एल्गार
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन (Independent Disability University) करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापण्याच्या आवश्यक सोयीसुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्त करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा – पाहा अपडेट
मुलीसाठी मोफत शिक्षण : उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा
या समितीने सविस्तर अहवाल 15 ऑगस्ट 2024 पर्यत राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा, हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, त्यानंतर लवकरच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी – राज्य शासनाचा निर्णय
सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज