नव्या वर्षात शिक्षण विभागाला मिळाले नवे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त IAS Officers Transfers

राज्यात नवीन सरकार स्थापन होताच, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता प्रशासनातही फेरबदल सुरु करण्यात येत असून, राज्यातील सनदी अधिकारी (IAS Officers Transfers) यांच्या बदल्या करण्यात आल्या, नुकतेच राज्याचे (School Education Minister Dadaji Bhuse) शालेय शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला, आता नव्या वर्षात (New Year 2025) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त पदी नवीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नव्या वर्षात शिक्षण विभागाला मिळाले नवे शिक्षण आयुक्त

महराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त पुणे या रिक्त पदावर श्री सचिंद्र प्रताप सिंह (Shri Sachindra Pratap Singh) यांना ते पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून त्यांची नियुक्ती केली आहे. तसेच त्यांच्या जागेवर श्री. अनिल डिग्गीकर, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी, याबाबत सध्याच्या पदाचा कार्यभार श्री. डिग्गीकर, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार श्री. सुरज मांढरे (Shri. Suraj Mandhare), भाप्रसे, यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. असा आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

New Education Commissioner

हे ही वाचा : नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्मचारी अपडेट्स : कंत्राटी कर्मचारी | अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट | आशा वर्कर अपडेट | सरकारी कर्मचारी

शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवपदी श्री रणजित सिंग देओल

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवपदी श्री रणजित सिंग देओल (Shri Ranjit Singh Deol) यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर श्रीम.आय.ए. कुंदन, भाप्रसे यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेश होईपर्यंत सध्याच्या प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.

New Principal Education Secretary

Leave a Comment