Hostel Admission : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवली येथील शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापक यांनी केले आहे.
या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात.
लाडकी बहीण योजनेचे अपात्रता निकष येथे पाहा
लेक लाडकी योजनेचा निधी मंजूर, पात्र लाभार्थ्यांना किती मिळणार लाभ? येथे पाहा
सर्व नोकरीच्या जाहिराती येथे पाहा
तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम – 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी