Health Recruitment 2025 : महाराष्ट्र सरकारने साथरोग नियंत्रणासाठी आणि आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रालय, मुंबई येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत साथरोग कायद्यात सुधारणा, त्याची कठोर अंमलबजावणी तसेच रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
रिक्त पदे भरण्यास गती
➡️ १५ दिवसांत ४०० वैद्यकीय अधिकारी पदे भरली जाणार.
➡️ २००० रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार.
➡️ MPSC कक्षेबाहेर काढून २३ जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदे विभागीय पदोन्नतीद्वारे भरली जाणार.
राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती!
साथरोग नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
✅ साथरोग कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार.
✅ नगरविकास व ग्रामविकास विभागाने पाणी, अन्न व स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.
✅ GBS, डेंग्यू, मलेरिया, झिका यांसारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात.
✅ अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांवर गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना.
गेल्या काही वर्षांत अन्न, पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे साथीचे आजार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविडच्या काळातही अशा चुकांमुळे संसर्ग वाढल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सरकारने आता पूर्वतयारी व खबरदारी घेण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!
This is very well step take by govt thanks
Its one of the golden opportunity…..