Health Employee Meeting
Health Employee Meeting : आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल उंचविण्यासाठी तसेच आरोग्य उपक्रमांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-१ डॉ. निपुण विनायक आणि सचिव-२ विरेन्द्र सिंह यांनी आपल्या नागपूर दौऱ्यामध्ये सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर येथे भेट देऊन डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यशाळा (Health Employee Meeting) घेतली.
निवासी डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निर्णय
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी तसेच आरोग्य सेवा उपक्रमांना अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
या बैठकीत आरोग्य सेवांचे बळकटीकरण, कर्मचार्यांच्या अडचणी, तसेच भविष्यातील आरोग्य सेवा सुधारणा योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
यावेळी अशोक आत्राम, सह सचिव, आण्णासाहेब चव्हाण, सीईओ (SHAS), डॉ. नितिन अंबाडेकर संचालक, आरोग्य सेवा, डॉ. सरिता हजारे, सहसंचालक, पुणे, डॉ. महेंद्र केंद्रे, ब्लड बँक, डॉ. दिप्ती पाटील, उपसंचालक, एनयूएचएम, डॉ. विनोद पहाळे, उपसंचालक, पीएच लॅब, पुणे, डॉ. संदीप सांगळे सहसंचालक, क्षयरोग व कुष्ठरोग, डॉ. सुनिता गोल्हाईत सहसंचालक, रुग्णालये व खरेदी, श्रीमती सोनल गावंडे, ओएसडी, डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक ,आयईसी, पुणे, सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. अजय डवले, उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, नारायण डोळस, सहायक कक्ष अधिकारी, मुंबई हे राज्य स्तरावरील अधिकारी (Health Employee Meeting) उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शासनस्तरावर मांडणी करण्यात येइल असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांनी (दि 14) गडचिरोली येथे स्पष्ट केले.
आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आणि सचिव वीरेंद्र सिंग यांनी आपल्या उच्चस्तरीय चमूसह गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा दोन दिवसांचा सखोल आढावा घेवून निरीक्षण केले. त्यांनी गडचिरोली येथे आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. तर आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्था ‘सर्च’ येथे भेट देऊन संवाद साधला.
या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू
✔ प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रस्ताव १५ दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या.
✔ पंधराव्या वित्त आयोग निधीचा प्रभावी वापर: निधीअभावी प्रलंबित योजनांसाठी त्वरित निधी मागणी करण्याचे निर्देश दिले, कारण निधीचा उपयोग करण्यासाठी आता केवळ एक वर्ष उरले आहे.
✔ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत): अधिकाधिक नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार करून प्रत्येक रुग्णाला विनामूल्य उपचार मिळतील, याची दक्षता घेण्याचे आदेश.
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी एकरकमी लाभ
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अधिकाधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यास प्राधान्य द्यावे,. कोणत्याही रुग्णावर केवळ आयुष्मान कार्ड प्रलंबित असण्याचे कारणास्तव उपचार थांबवले जाणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश सचिवांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक बाबींचे दस्तऐवजीकरण करून, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सचिव द्वयांसोबत सह सचिव अशोक आत्राम, सीईओ (SHAS) आण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, पुणे येथील सह संचालक डॉ. कमलापुरकर आणि डॉ. सरिता हजारे, ब्लड बँकेचे डॉ. महेंद्र केंद्रे, एन.यू.एच.एम.च्या उपसंचालक डॉ. दिप्ती पाटील आणि डॉ. विनोद पहाळे, कुष्ठरोग सह संचालक डॉ. संदीप सांगळे, हॉस्पिटल आणि प्रोक्योरमेंटच्या सह संचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच सोनल गावंडे, डॉ. कैलास बाविस्कर आणि कक्ष अधिकारी नारायण डोळस ही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चमू दोन दिवसीय दौऱ्यात सहभागी होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित
दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली. प्रस्तावित इमारत बांधकाम, आवश्यक साधनसामग्री, तसेच प्राध्यापक आणि तांत्रिक मनुष्यबळ यावर सखोल चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री पंडा व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडे यांनी जिल्ह्यात चार नवीन आरोग्य केंद्र मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले. तसेच नवीन आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करतांना गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीत लोकसंख्यानिहाय विचार न करता, आदिवासी दुर्गम व विस्तिर्ण क्षेत्राचा विचार करून विशेष उपकेंद्रांची निर्मिती व्हावी असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची सविस्तर माहिती सादर केली.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…