महाराष्ट्र सरकारचा आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम – 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध! Free Health Checkup Maharashtra

Free Health Checkup Maharashtra : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर महिला आणि नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, कॅन्सर उपचार केंद्रे, डिजिटल एक्स-रे मशिन्स, सीटी स्कॅन सुविधा आणि नव्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी!

राज्यात 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून, यामध्ये खालील चाचण्या समाविष्ट असतील –
✔️ रक्त तपासणी
✔️ हिमोग्लोबिन चाचणी
✔️ मधुमेह आणि रक्तदाब तपासणी
✔️ आवश्यकतेनुसार इतर निदान आणि उपचार सुविधा

स्टाफ नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील ‘या’ कंत्राटी शिक्षकांना यापुढे नियुक्ती मिळणार नाही – कंत्राटी भरतीचा शासन निर्णय

8 ठिकाणी अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्रे आणि मोबाईल कॅन्सर व्हॅन्स

राज्यातील 8 ठिकाणी कर्करोग निदान आणि उपचारासाठी विशेष मोबाईल कॅन्सर व्हॅन सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
📍 लोकार्पण होणारी स्थाने:
अकोला
औरंगाबाद
लातूर
कोल्हापूर
ठाणे
नागपूर
नाशिक
पुणे

🩺 कॅन्सर व्हॅनच्या सुविधांमध्ये:
✔️ कर्करोग प्रतिबंधात्मक समुपदेशन (Preventive Oncology)
✔️ निदान आणि बायोप्सी सेवा
✔️ संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान

जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय: ६ किमोथेरपी सेंटर आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न

राज्यभर 6 नवीन किमोथेरपी केंद्रे सुरू

सार्वजनिक आरोग्य विभागाने 6 जिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन किमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
📍 ठिकाणे:
ठाणे
सोलापूर
अहिल्यानगर
छत्रपती संभाजीनगर
नांदेड
वर्धा

🔹 या केंद्रांमध्ये विशेष प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका कार्यरत राहणार असून, रुग्णांना उत्तम दर्जाची किमोथेरपी सुविधा पुरवली जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी हे ‘रोल मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबविणार

7 नवीन अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका (ALS) उपलब्ध

गडचिरोली – उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा
चंद्रपूर – उपजिल्हा रुग्णालय, वरोरा
सिंधुदुर्ग – उपजिल्हा रुग्णालय, कणकवली
पुणे – उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर
रत्नागिरी – प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड
रायगड – ग्रामीण रुग्णालय, महाड

80 नवीन डिजिटल हँड एक्स-रे मशिनचे लोकार्पण

राज्यातील 34 ग्रामीण जिल्हे, 22 महानगरपालिका आणि मुंबईच्या 24 वॉर्डांसाठी 80 डिजिटल पोर्टेबल एक्स-रे मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शोधलेल्या संशयित क्षयरुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून राज्यातील 34 ग्रामीण जिल्हे, 22 महानगरपालिका व मुंबईच्या 24 वार्डासाठी राज्यस्तरावरुन आलेल्या 80 डिजिटल पोर्टेबल हँड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा

102 योजनेंतर्गत 384 नवीन रुग्णवाहिका सुरू

राज्यामध्ये 102 योजनेंतर्गत गरोदर माता व नवजात शिशुंना रुग्णालयात संदर्भित करण्यासाठी 384 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

नव्याने सुरू होणारी सीटी स्कॅन केंद्रे

📍 छत्रपती संभाजीनगर – उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर
📍 पालघर – उपजिल्हा रुग्णालय, डहाणू

उपजिल्हा रुग्णालय वैजापूर, छत्रपती संभाजीनगर व उपजिल्हा रुग्णालय डहाणू, जि.पालघर येथील सार्वजनिक खाजगी भागिदारीतून नव्याने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सीटी स्कॅन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.


आरोग्य सेवेतील क्रांती – महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ हजारो रुग्णांना होणार!

📌 मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा
📌 कॅन्सर प्रतिबंध आणि निदानासाठी आधुनिक व्हॅन आणि केंद्रे
📌 गर्भवती माता आणि नवजातांसाठी 384 नवीन रुग्णवाहिका
📌 102 योजनेअंतर्गत विशेष वैद्यकीय सुविधा राज्यभर उपलब्ध

📢 तुमच्या भागात ही सेवा कधी उपलब्ध होईल, हे जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
🔗 www.arogya.maharashtra.gov.in

Leave a Comment