मुलीसाठी मोफत शिक्षण : उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा

Free Education For Girl : राज्य शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, आता उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्क (Education Fees) रक्कम संबंधित कॉलेज यांनी न घेण्याबाबत शासन परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे, त्यामुळे तुम्ही उच्च शिक्षणाच्या प्रवेशाच्या वेळी शासकीय परिपत्रक सोबत ठेवू शकता.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या वर्षातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेश घेण्याच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत राज्य शासनाने काढलेल्या दिनांक 19 जुलै 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार सूचित केले आहे.

या प्रवर्गातील पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना सदरचा निर्णय लागू असणार

  • आर्थिकदृष्ट्या मागास (EBC)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
  • सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC)
  • इतर मागासवर्ग (OBC)

लाडकी बहीणींसाठी महत्वाची अपडेट! पैसे परत जमा करण्याबाबत महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

Free Education For Girl In Maharashtra G.R. PDF

आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना (मुले व मुली) शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के रक्कमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती. परंतु, दिनांक 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये, (Free Education For Girl In Maharashtra G.R. PDF) व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 100 टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मोफत करण्यात आले आहे. या रकमेची प्रतिपूर्ती शासन स्तरावरून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क (Education Fees) कॉलेज यांनी घेऊ नये – शासन परिपत्रक

वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण शुल्क मोफत करण्यात आले आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेण्याच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये, तसेच, ज्या विद्यार्थ्यांना 50 टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50 टक्के शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहेत.

मुलीसाठी मोफत शिक्षण : उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा

अधिक माहितीसाठी (फी न घेण्याबाबतचे) : शासन परिपत्रक पाहा

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा (दि 8 जुलै) रोजीचा : शासन निर्णय

‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे – जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment