Female Employees Apply for Govt Hostel: नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व पात्र महिला कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते.
या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे.
बोरिवली येथील वसतीगृहात सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापक, शासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका संदर्भात महत्वाची अपडेट
अधिक माहितीसाठी : कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.