Family Pension Gratuity GR : परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS), राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) आणि मृत्यु उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान (Retirement Gratuity) अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने सुधारित स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Table of Contents
राज्यातील कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी | Family Pension Gratuity
राज्यातील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजनेतील हे लाभ मिळणार, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत निर्णय!
Old Pension Scheme : शासनाने दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार असा निर्णय घेतला आहे की, दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा
- (अ) सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान,
- (ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.
- त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
- (क) तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.
वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य:स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.
नवीन शासन निर्णय! सातवा वेतन आयोग नवीन शासन निर्णय पहा
फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी निर्णय काय आहे?
- राज्य शासनाच्या सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान लाभ मिळणार आहे. (Family Pension) आणि ग्रॅच्युटी (Gratuity)
- रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात आली आहे. (सेवेत असतांना जखम/इजा/आजारपण इत्यादिमुळे सेवा समाप्त झाल्यास रुग्णता निवृत्तीवेतन (जुनी पेंशन) आणि सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी(सेवा उपदान) लाभ)
- शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे. (सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पूर्वीप्रमाणे रिटायरमेंट ग्रॅच्युटी (सेवा उपदान.)
कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी रकमेत वाढ करण्याचा शासन निर्णय पहा
महत्वाचे अपडेट्स : कंत्राटी कर्मचारी | अंगणवाडी कर्मचारी | सरकारी कर्मचारी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती येथे पाहा
उपदान रक्कम म्हणजे काय? । What is Gratuity amount?
What is Gratuity : उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली रक्कम आहे, ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते.
उदाहरण –
- समजा 1 वर्ष च्या आत सेवा – असल्यास मिळणारे उपदान- अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मिळते.
- 1 वर्ष ते 5 वर्ष सेवा- मिळणारे उपदान- अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम,
- 5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान – अंतिम वेतनाच्या 12 पट रक्कम
- 11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान – अंतिम वेतनाच्या 20 पट रक्कम
- 20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान अंतिम वेतनाच्या 33 पट रक्कम
(कमाल मर्यादा 14 लाख..₹) कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी रकमेत वाढीचा शासन निर्णय पहा
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजीच्या परिपत्रकान्वये याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आता यामध्ये सुधारित मार्गदर्शन देण्यात आले आहे.
Family Pension Gratuity GR सुधारित शासन निर्गमित
राज्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्तिवेतन (pension) प्रकरणामध्ये काही मुद्दयाच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आता सुधारित शासन निर्णय निर्गमित करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी निवृत्तिविषयक प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजीच्या सुधारित बाबी विचारात घ्याव्यात असे कळविले आहे.
फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी सुधारित शासन निर्णय पाहा
दिनांक 31 मार्च रोजीचा शासन निर्णय पहा
कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी रकमेत वाढ करण्याचा शासन निर्णय पहा