Family Pension Circular : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या ‘पेन्शन’ योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय

Family Pension Circular : केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकरणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) मिळण्याची तरतूद

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११६ अन्वये कुटुंब निवृत्तिवेतनाबाबत तस्तूदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्युनंतर अविवाहित मुलीच्याबाबतीत ती २४ वर्षे वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत तिला कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्यात येते. तसेच मानसिक अथवा शारिरीक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) मिळण्याची तरतूद आहे.

कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत निवृत्तिवेतनात सुधारणा

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्युनंतर कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) प्रदान करणेबाबत निवृत्तिवेतनाबाबत सुधारणा केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खुशखबर! पेन्शनच्या विलंबाला आता पूर्णविराम! नवीन प्रणाली सुरू!

Family Pension सुधारित शासन परिपत्रक

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्याच्या, निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबतचा शासन परिपत्रक (Family Pension Circular) निर्गमित करण्यात आला आहे.

अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला २४ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर हयातभर, तिचा विवाह / पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत शासन परिपत्राकातील अटीच्या अधिन राहून कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित शासन परिपत्रक पाहा

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) सुधारीत कार्यपध्दती – शासन निर्णय निर्गमित

कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन निर्गमित

या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू

Leave a Comment