Employees Residence Bhoomipujan
Employees Residence Bhoomipujan : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 3 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम यादी येथे पाहा
आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार
श्री. पवार म्हणाले, सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नव्याने करण्यात येणाऱ्या निवासस्थान इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ पद्धतीचे करावे. त्याकरीता उत्तमप्रतीचे साहित्य वापरावे. या इमारतीमुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार असून अप्रत्यक्षपणे येथील रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना देखील याचा लाभ होणार आहे. एकूणच सांगवीच्या वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहील असे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय
आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट | आशा स्वयंसेविका यांना मोबाईल फोन सह आता रिचार्जसाठी पैसे मिळणार
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम पूर्ण करुन लोकार्पण
ते पुढे म्हणाले, बारामती तालुक्यात नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळण्याकरीता पुढील 50 वर्षाचा विचार करुन इमारती बांधण्यात येत आहेत. याकरीता निधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यापूर्वी देखील बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, बारामती बसस्थानक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अशा प्रशस्त, सुंदर, भव्य, सोईयुक्त, आकर्षक आणि दर्जेदार इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन लोकार्पण करण्यात आले आहे. (पोलिसांना सेवा सदनिका देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश)
मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!
सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात विविध विषयांसाठी भरीव तरतूद
राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शेती, उद्योग, रोजगार शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
समाजातील सर्व घटकातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना
समाजातील सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याकरीता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे पुणे मंडळाचे कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजित तावरे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे आदी उपस्थित होते.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…