राज्यातील ‘MJP’ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत महत्वाची बैठक संपन्न; बैठकीतील महत्वाचे मुद्दे पाहा

Employees MJP : कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक तसेच वेतनवाढ आणि अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाची चर्चा करण्यात आली, सविस्तर वाचा.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सेवेत असताना मृत्यू झाल्याने 460 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यास अनुकंपा पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या 3500 रूपये वेतनवाढ दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran) संचालक मंडळाची बैठक होऊन विविध योजनांतील कामांचा आढावा घेण्यात आला. कर्मचारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी अनुकंपाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत मंत्री श्री.पाटील यांचे आभार मानले.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी सरकारने कोणता निर्णय घेतला येथे पाहा

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका – मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Employees MJP) मधील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका घेतली असून कालबद्ध पदोन्नती, बोनस, प्रलंबित फरक या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू व या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी – राज्य शासनाचा निर्णय

कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित वर्गणी ‘EPF’ मध्ये जमा करणार – मंत्री गुलाबराव पाटील

यावेळी आमदार महेश बालदी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मजीप्राचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10000 हजारांची भरघोस वाढ, राज्य सरकारचा निर्णय!

Leave a Comment