Employees Medical Bill GR : राज्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.
वैद्यकीय खर्च (Medical Bill) प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत हा शासन निर्णय आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या
“महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील नियम क्र.२ (३) (तीन) नुसार खालीलप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये “महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्याची निवड करता येईल” अशी तरतुद करण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!
या तरतुदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात सदर बाबत दिनांकासहीत नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
गुड न्यूज! जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाचे परिपत्रक येथे पाहा
कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात ‘सुधारित’ शासन निर्णय
महिला शासकीय कर्मचाऱ्याने विवाहापश्चात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या “आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या (आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांसह) वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी निवड केली आहे” असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखास कळविणे बंधनकारक आहे.
अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक माहिती पाहा
सदर अर्जासोबत संबंधित विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे हे पूर्णपणे तिच्यावर अवलंबुन आहेत, याबाबतचा सबळ पुरावा (अद्ययावत रेशनकार्डाची प्रत, नोंदणीकृत शपथपत्र इ.) अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन आदेश जारी
अविवाहीत महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर विकल्पाची सेवापुस्तकात नोंद घेण्याची आवश्यकता नाही. परंतु, संबंधित महिला शासकीय कर्मचाऱ्याने कुटुंबातील अवलंबित सदस्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्ताव सादर करतेवेळी प्रस्तावासोबत कुटुंबाचे प्रमाण जोडणे व त्यामध्ये त्या अविवाहीत असल्याचे नमूद करणे आवश्यक राहील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात मोठी अपडेट
दरम्यानच्या कालावधीत शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, शासकीय सेवेत नव्याने रुजू होण्याऱ्या महिला शासकीय कर्मचारी यांना विवाहापुर्वी त्यांच्या आई-वडीलांवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे.
कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा
मात्र काही महिला कर्मचाऱ्यांकडून विवाहापश्चात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने “आई-वडील” किंवा “सासू-सासरे” या पैकी एकाची निवड करुन तसा विकल्प देवुन त्याची सेवापुस्तकात नोंद घेण्याची तरतुद अवगत नसल्याने, त्यांच्या सेवापुस्तकात वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या अनुषंगाने “आई-वडील” किंवा “सासू-सासरे” या पैकी एका विकल्पाची नोंद घेण्यात आलेली नसल्याचे दिसून आले आहे.
तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडुन रुग्णाच्या उपचारादरम्यान वा उपचारानंतर सेवापुस्तकात आई-वडील किंवा सासू- सासरे या पैकी एका विकल्पाची नोंद घेऊन त्यानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची मागणी केली जाते.
या सर्व बाबी विचारात घेता, शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्याची मुभा असल्याची बाब विचारात घेता, त्याअनुषंगाने दिनांक 14 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय अधिक्रमित करुन सुधारीत आदेश दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी : सविस्तर शासन निर्णय येथे पाहा