Employees Master Database : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांची ‘या’ संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत होणार
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै, २०२४ या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, सुधारित शासन परिपत्रक पाहा
कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल संदर्भात – शासन परिपत्रक
यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर, २०२४ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित न करणेबाबत शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
CET Cell Schedule 2025-26 – Click Here
तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) साठीचे संकेतस्थळ कार्यान्वीत नाही.
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी संदर्भात अपडेट
त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी संर्वकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही, अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर २०२४ थी वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय/प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Employees Master Database (EMDb) संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येणार आहे.
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक
राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, शासन निर्णय जारी