Employees Latest Update : मंत्री विखे-पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असून लवकरच शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मंत्री विखे पाटील यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेतल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले.
महसूल खात्याच्या विविध विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या संप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संप थांबवण्याचे आवाहन करून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे महसूल संघटनांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
राज्यातील ‘या’ योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी मान्य पाहा अपडेट
त्यानुसार अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्रालयात बैठक होऊन चर्चा झाली. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वच जिल्ह्यातील 15 जुलैपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते . 11 जुलैला या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तर दुसऱ्या दिवशी लेखणीबंद ठेवून आंदोलन केले होते.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी सरकारने कोणता निर्णय घेतला येथे पाहा
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, राज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, मुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष अविनाश सांगाडे आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी – राज्य शासनाचा निर्णय