प्रसिध्दीपत्रक : रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली; निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी पदाचे हॉल तिकीट जारी – डायरेक्ट लिंक

DTP Hall Ticket Download : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली असून, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी पदाचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे.

रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

त्यानुषंगाने यापूर्वीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये सदरहू पदांच्या परीक्षा माहे नोव्हेंबर २०२४ मधील दि.२५/११/२०२४, दि.२६/११/२०२४ व दि.२७/११/२०२४ या दिनांकास घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

१) रचना सहायक पदाची परीक्षा- सदरची परीक्षा दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

तुमच्या गाव/ शहराची मतदार यादी येथे पाहा

निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी पदाचे हॉल तिकीट जारी – डायरेक्ट लिंक

२) निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदांच्या परीक्षा दि.२६ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येत आहेत. या पदांच्या परीक्षांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) प्राप्त करून घेण्याबाबतची लिंक नजीकच्या कालावधीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Hall Ticket Download Link

अधिक माहितीसाठी : https://dtp.maharashtra.gov.in/

प्रसिद्धी पत्रक : येथे पाहा

Leave a Comment