मोफत ई-व्हेईकल दुकान योजना
Divyang E Vehicle : महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एक अनोखी संधी घेऊन आले आहे. दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणपूरक फिरते ई-व्हेईकल दुकान (Mobile Shop on e-Vehicle) मोफत मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज कधी करायचा?
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळ ६ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे, इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत?
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचे वय ०१ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करू शकतात.
- दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी निवडताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- अति तीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास, अशा परिस्थितीत परवानाधारक नसलेल्या अति तीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort) साहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- अर्जदाराने अर्जासोबत सर्व अटी मान्य असल्याचे आणि संबंधित वाहनाची योग्य काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
- अर्जदार शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
- राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल.
आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठी नवीन नियमावली लवकरच!
अर्ज कसा करावा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या https://register.mshfdc.co.in/ या अधिकृत पोर्टलला भेट द्या. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची सही
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- निवासी पुरावा
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- UDID प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- बँक पासबुकचे पहिले पान