ताज्या बातम्या

केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने आरोग्यासंदर्भात नवीन अभिनव उपक्रम सूरु, Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan

Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan : भारत सरकारच्या केंद्रिय आयुष (Ministry of AYUSH) मंत्रालयाच्या वतीने देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात एक नवीन अभिनव उपक्रम सूरु केला आहे. त्याचे नाव आहे “देश का प्रकृती परीक्षण” (Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan). या अभियानांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या (Ayurveda science) माध्यमातून आयुर्वेद चिकित्सकांकडून १८ ते ७० वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात येणार आहे.

Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan या महत्वाकांकशी कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी मा. जिल्हाशल्यचिकित्सक ठाणे डॉ. कैलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि अति. जिल्हाशल्यचिकित्सक ठाणे डॉ. धीरज महंगाडे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (ब.स) डॉ. मृणाली राहूड यांच्या साथीने व सहाय्यक संचालक सुश्रुषा डॉ. निलीमा सोनावणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वि. सा. सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयुष च्या थीमचे अनावरण केले आणि मुख्याध्यापिका सुश्रुषा प्रशिक्षण केंद्र श्रीम मेस्त्री आणि सर्व पाठ्यनीरदेशीका यांच्या प्रेरणादायी विचारांनी “देश का प्रकृती परीक्षण” (Desh Ka Prakriti Parikshan) या थीम वर प्रशिक्षणार्थी सुश्रुषा विध्यार्थ्यांनी उत्कृष्ठ असे पथनाट्य सादर केले.

राज्यातील गटप्रवर्तकांना वाढीव मानधन

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित शॉर्ट फिल्म पाहा

त्यानंतर अधिसेविका श्रीम प्रतिभा बर्डे यांच्या साथीने रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करत सर्व अधीपरिचारिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील सुश्रुषा संवर्गाचे सशक्तिकरण हा ध्यास डॉ सोनावणे यांनी घेतलेला असून त्यात महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये व सुश्रुषा प्रशिक्षण केंद्रान्ना भेट दिली जात आहे आणि अश्याच प्रकारे वि. सा. सामान्य रुग्णालय ठाणे येथील आरोग्य सेवा व सुश्रुषा शिक्षणाचा दर्जा अजून उंचावण्यासाठी अधिसेविका आणि सर्व पाठ्यनीरदेशीका, आधीपरिचारिकांच्या समस्यांचे निवारण करत डॉ सोनावणे यांनी मार्गदर्शन केले व सशक्त महाराष्ट्राचे विचार सर्वांमध्ये रुजवले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

याप्रसंगी डॉ सोनावणे यांनी सुश्रुषा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांची खास भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या व उत्तम आरोग्य सेवा देण्याचे प्रोत्साहन दिले.डॉ सोनावणे यांनी मुख्याध्यापिका आणि सर्व पाठ्यनिर्देशीकांना भेटून शैक्षणिक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले आणि रूग्णालय स्तरावरील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण नियमित आयोजित करण्याचे मा अधिसेविकांना निर्देश दिले.

भारतीय परिचर्या परीषदेच्या च्या “dual role model” नुसार रूग्णालय स्तरावरील परिचर्या संवर्गाच्या अनुभवी सेवा नर्सिंग प्रशिक्षणाकरिता उपयोगात आणण्याबाबत निर्देश दिले जेणेकरून परिचर्या शिक्षण व सेवा यातील दरी मिटण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांना “Quality Nursing Education” मिळेल. आपल्या भेटीत डॉ सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती मिळन्याकरिता करिता महाविद्यालयाने प्रयातशिल राहण्याबाबतचे मार्गदर्शन केले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संस्कार च खरे ज्यात रुग्णसेवेला प्राधान्य देत आरोग्य सेवा देणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची पुढची पिढी घडविणे ही तितकेच महत्वाचे मानले जाते.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

3 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

3 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

3 weeks ago