Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan : आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान‘ राबविण्यात आला होता. या अभियानात शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या प्रकृती परीक्षणात छत्रपती संभाजी नगर जिल्हा 20 हजार पेक्षा जास्त परीक्षणे नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

२९ ऑक्टोबरला आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियानाची घोषणा केली होती, यानुसार २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत आयुर्वेद आर्हता धारक प्राध्यापक, विद्यार्थी, खाजगी व्यावसायिक व शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत १८ ते ७० वर्ष वयोगटातील एक कोटी लोकांचे प्रकृती परीक्षण करण्याचा उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण देशभरात प्रकृती परीक्षण अभियान राबविण्यात आला. अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्या प्रकृती परीक्षणांने झाली होती.
आशा सेविकांसाठी युट्युब Channel येथे पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या पदांसाठी जाहिरात
अभियानाच्या सुरुवातीला आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, पदवीत्तर विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमार्फत प्रकृती परीक्षण करण्यात आले. परंतु देशाचे आयुष मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव (Pratapraoji Jadhav) यांच्या सूचनेनंतर या अभियानात शासकीय सेवेतील आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला.
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासन निर्णय!
Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan या अभियानात शासकीय सेवेतील आयुर्वेद आर्हता धारक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा, अमगोथु श्री रंगा नाईक व सहाय्यक संचालक आयुष डॉ. आर.एस. हंकारे यांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विशेष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन सर्व जिल्हा शिल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना राज्यातील सर्व आरोग्य संस्थांत प्रकृती परीक्षण करण्यास सूचित केले होते.
याशिवाय भारतीय चिकित्सा प्रणालीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. जयंत पुजारी, आयुष संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, भारतीय चिकित्सा पद्धतीचे महाराष्ट्र कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, प्रकृती परीक्षण अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. दत्तात्रय पाटील व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे शाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिनांक १३ व १९ डिसेंबर रोजी राज्यातील आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन आयुष मंत्रालयाच्या ॲपद्वारा प्रकृती परीक्षण करण्यात येणारे अडचणीवर मार्गदर्शन केले.
प्रकृती परीक्षण करण्यासाठी आयुष मंत्रालयाने विशेष ॲप तयार केले आहे. या एकच ॲपवर सामान्य नागरिक व आयुर्वेद डॉक्टरांना लॉगिन करण्याची सोय देण्यात आलेली आहे. आयुर्वेद डॉक्टरांना प्रकृती परीक्षण करण्यासाठी एम.सी.आय.एम. कौन्सिलचा नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे, सबब केवळ आयुर्वेद डॉक्टरांनाच प्रकृती परीक्षण करता येते. सामान्य नागरिकांनी प्रकृती परीक्षण ॲपवर स्वतःचं नाव, वय व पूर्वीचे आजार अशी माहिती भरल्यानंतर क्यू आर कोड तयार होतो. या क्यू आर कोडला आयुर्वेद डॉक्टरांद्वारे स्कॅन करून २२ मुद्द्यांचे आधारे नागरिकांची शारीरिक तपासणी व प्रश्न विचारून प्रकृती परीक्षण केले जाते.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुर्वेद-युनानी दवाखाने व आरोग्यवर्धिनी केंद्रातील आयुर्वेद आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी व आर.बी. एस.के. वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रकृती परीक्षण अभियानात सहभागी करण्यासाठी जिल्हा आयुष कक्षाचे नियंत्रणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील यांनी विशेष नियोजन केले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!
या अभियाना अंतर्गत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा प्रकृती परीक्षण करून घेतला. याप्रसंगी जिल्ह्यात सर्वात जास्त प्रकृती परीक्षण करणारे डॉ. मोनम डव्हळे (६४१) बनोटी ता. सोयगाव, डॉ. परमेश्वर फालके (५३३) उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व जिल्हा रुग्णालयातील डॉ. रवींद्र बोर्डे (312) डॉ. पठाण सारा अंजुम (303) डॉ. जयश्री पवार (302) व डॉ. सोनाली गोंडगे (300) यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रकृती परीक्षण अभियानाच्या नियोजनात डॉ बाळकृष्ण लांजेवार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ प्रशांत बडे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय,डॉ सारिका लांडगे साथरोग वैद्यकीय अधिकारी, श्रीमती विद्या सानप जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ अनीसा पठाण, डॉ खालीद पठाण श्री अशोक, मनोज देशपांडे सिनेयंत्र चालक श्रीमती शारदा कांबळे आयुष डेटा ऑपरेटर यांनी मोलाचा योगदान दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य व आयुष अभियान अंतर्गत ‘या’ पदासाठी थेट मुलाखत