आशा वर्कर, गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर, December Salary

December Salary : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका (ASHA volunteers) व गटप्रवर्तक (Group Promoters) तसेच महिला व बालविकास (ICDS) विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याचा मोबदला, मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे शासन निर्णय निर्गमित झाले आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या डिसेंबर महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये रु.३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लक्ष असे एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतकी तरतूद राज्यशासनाने अर्थसंकल्पीत केलेली आहे.

सदर मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना (December Salary) डिसेंबर २०२४ या १ महिन्याच्या कालावधीची रक्कम रु.८२७२.३१ लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला कधी? पाहा अपडेट

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय

केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन (Anganwadi Sevika Salary) नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर, (December Salary) २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता एकूण रुपये १६३.४३ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री यांचा महत्वपूर्ण निर्णय

‘हे’ 5 निकष लावून होणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या

Leave a Comment