केंद्र शासनाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना DA वाढ लागू करण्यात आली आहे.
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.०१.०७.२०२४ पासून लागू करण्यात आलेली ३% (५०% ते ५३%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, शासन परिपत्रक पाहा
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.०१.०७.२०२४ पासून ५३% दराने महागाई भत्ता वाढ करण्यात आला आहे. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, शासन परिपत्रक पाहा