Contractual Employees Regularization : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत चे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केले आहे. (शासन आदेश PDF खाली दिलेला आहे)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनाबाबत मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १८/०८/२०२३ व दिनांक ३१/१०/२०२३ रोजी बैठका आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये दर वर्षी रिक्त होणा-या पदांवर सरळसेवेने भरण्यात येणा-या कोटयापैकी सरळसेवेने ७० टक्के व उर्वरित ३० टक्के पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने प्रस्ताव मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. मा. मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करुन त्यामध्ये सरळसेवेने ७० टक्के व दर वर्षी समावेशनाने ३० टक्के भरती करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमाच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आलेला होता.
राज्यातील या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, बैठकीतील ठळक मुद्दे
‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी
सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १४/०३/२०२४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सेवाप्रवेश नियम दुरुस्त करुन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचा-यांचे सेवा समायोजन करणे शक्य होणार नसल्याचे अभिप्राय दिलेले आहेत.
मा. मंत्रीमंडळाने दिनांक १३/०३/२०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या कर्मचा-यांची सेवा १० वर्ष व त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समायोजनासाठी सेवाप्रवेश नियम दुरुस्त न करता १० वर्ष पुर्ण झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, ग्राम विकास विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील समकक्ष रिक्त पदावर तसेच समकक्ष पद उपलब्ध नसल्यास शैक्षणिक अर्हतेनुसार एकवेळची बाब म्हणून नियमित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील सपोर्ट स्टाफ (गट-ड) या नियमित पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील समान, समकक्ष व शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणा-या सपोर्ट स्टाफ (गट-ड) संवर्गाच्या पदांची अंतिमतः प्रसिध्द झालेल्या राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठतेनुसार एकवेळची बाब म्हणून सपोर्ट स्टाफ (गट-ड) या पदावर सेवा समायोजित करुन पदस्थापनेसह शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सपोर्ट स्टाफ (गट-ड) या पदावरील १० वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील समान, समकक्ष व शैक्षणिक अर्हतेनुसार समकक्ष असलेल्या पदांवर शासन निर्णयात नमुद सपोर्ट स्टाफ (गट-ड) यांना समायोजनाने शासन सेवेत अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन सेवेत समायोजनाने पदस्थापनेसह नियुक्ती देण्यात आली आहे.
सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या