Contract Workers Increase Salary : महावितरण कंपनी अंतर्गत कंत्राटदारांमार्फत कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना दि. १ एप्रिल २०२४ पासून सध्याचा मूळ वेतनामध्ये (Basic Salary) मध्ये १९% वाढ करणेबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
किमान मूळ वेतनाच्या (बेसिकच्या) १९% इतकी वाढ देण्याबाबतचा निर्णय
तत्कालीन मा. उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महोदय, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. अपर मुख्य सचिव, (ऊर्जा) तथा व्यवस्थापकीय संचालक, म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी मर्या. आणि मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांच्या उपस्थितीत दि. ०९/०९/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत तिन्ही कंपन्यांमध्ये कंत्राटदारांमार्फत कार्यरत बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून मुंबई दुकाने व आस्थापना अनुसूचि अंतर्गत सुधारित किमान वेतनाची अधिसूचना जारी होईपर्यंत किमान मूळ वेतनाच्या (बेसिकच्या) १९% इतकी वाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल आहे.
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित होणार, परिपत्रक पाहा
सदर विषयाच्या अनुषंगाने आता कक्ष अधिकारी, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी त्यांचे पत्र दि. १४/१०/२०२४ नुसार कंपनीतील बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांना सद्यस्थितीत लागू असलेल्या किमान वेतनामध्ये दि. ०१ एप्रिल २०२४ पासून मात्र मूळ वेतनामध्ये (बेसिकमध्ये) १९% वाढ करण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. (Contract Workers Increase Salary)
राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी
त्यानुषंगाने, कार्यरत बाहयस्त्रोत कंत्राटी कामगारांना सद्यस्थितीत लागू असलेल्या किमान वेतनामध्ये दि. १ एप्रिल २०२४ पासून मात्र मूळ वेतनामध्ये (बेसिकमध्ये) १९% वाढ करण्यास मंजूरी दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या
विद्यमान पूरक भत्त्याच्या रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तसेच भविष्यात महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून मुंबई दुकाने व आस्थापना अनुसूचि उद्योगातंर्गत सुधारित किमान वेतनाची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी अधिसुचना निर्गमित झाल्याच्या तारखेपासूनच करण्यात येईल.
अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
राज्य शासनाचे उप सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय यांनी दि. २४ जुलै २०१९ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल मध्ये प्रसिध्द केलेल्या शुध्दीपत्रकानुसार मुंबई दुकाने व आस्थापना उद्योगातील अनुसूचिकरिता किमान वेतन अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कामगारांचे किमान वेतनाचे दर दि. २४/०७/२०१९ पासून पुर्ननिर्धारित केलेले आहेत.
त्यानुसार महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना सुधारीत दराने मूळ किमान वेतन दि. २४/०७/२०१९ पासून लागू करण्यात आलेले आहेत.
परिमंडळनिहाय मूळ वेतन
Contract Workers Increase Salary : महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत बाहयस्त्रोत कंत्राटीपध्दतीने कार्यरत कामगारांच्या मूळ वेतनामध्ये दि. ०१ एप्रिल २०२४ रोजीपासून १९% इतकी वाढ केल्यास परिमंडळनिहाय मूळ वेतन खालीलप्रमाणे असणार आहे.
सर्व संबंधित कार्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे की, आपल्या अखत्यारित कंत्राटदारामार्फत बाहयस्त्रोत कंत्राटीपध्दतीने कार्यरत कामगारांना दि. १ एप्रिल २०२४ पासून वरीलप्रमाणे मात्र मूळ वेतनामधे वाढ माहे ऑक्टोबर २०२४ च्या मासिक वेतनापासून लागू करण्यात यावी. माहे एप्रिल २०२४ ते माहे सप्टेंबर २०२४ या कालावधीमधील देय रक्कम माहे ऑक्टोबर -२०२४ मध्ये कंत्राटदारामार्फत अदा करण्यात यावी.
सदरचे परिपत्रक महावितरण कंपनीच्या Employee Portal वरील Circular (I.R. Department) येथे उपलब्ध असून त्यांची मुद्रांकित प्रत प्रसारीत करण्यात येणार नाही. असे कळविण्यात आले आहे.