राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात कोणताही बदल नाही; राज्य शासनाचे स्पष्टीकरण Contract Employees Transfer Policy

Contract Employees Transfer Policy : कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेतील लाभ मिळावा यासाठी करार कर्मचारी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, यामध्ये नुकतेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली बाबतचे धोरण याबाबत राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

करार कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा

समग्र शिक्षा अंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचा-यांच्या बदल्यांबाबत धोरण निश्चित करणेबाबतच्या प्रस्तावास शासन मान्यता मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती, मात्र यापुर्वी शासनकडून दि. ११.८.२०२१ रोजीच्या पत्रान्वये या करार कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचे धोरण (Contract Employees Transfer Policy) निश्चित करून देण्यात आलेले आहे. सदर आदेश शासनाकडून अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदर तरतुदीनुसार सदर प्रकरणी आपल्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा, यासाठी प्रत्येक वर्षी नव्याने शासनाकडे संदर्भ करण्याची आवश्यकता नाही. अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता समग्र अंतर्गत करार कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. नेमकं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बादलीचे धोरण काय आहे? सविस्तर पाहूया.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन, आदेश निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील या करार कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा शासन निर्णय निर्गमित; या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम

करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे बदलीचे धोरण निश्चित

राज्यातील समग्र शिक्षांतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे, याबाबतचे नियम खालील प्रमाणे

नियम | Contract Employees Transfer Policy

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सेवा नियमावली, १९९४ नुसार मा. राज्य प्रकल्प संचालक यांना प्रशासकीय कारणास्तव बदलीचे अधिकार आहेत. त्या अधिकारात बदल्यांना मान्यता देता येईल.

आंतरजिल्हा बदलीसाठी आपापसात बदली, दिव्यांग, पती-पत्नी एकत्रीकरण, गंभीर आजार, विधवा, परितक्त्या, इ. विचार करण्यात यावा, यांस राज्य प्रकल्प संचालक यांची मान्यता घेण्यात यावी.

या संवर्गाचा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे

१) गंभीर आजार (दस्तावेज आवश्यक)
यामध्ये कर्मचारी स्वतः / कर्मचाऱ्याची आई वडील, यथास्थिती पती / पत्नी यांना पुढील आजार,
हृदयशस्रक्रिया (Heart Surgery), हृदयउपमार्ग शस्त्रक्रिया (Bypass Surgery), अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty), मूत्रपिंड प्रतिरोपण शस्रक्रिया (Kidney Transplant), सर्व प्रकारचे कर्करोग, किडनी डायलेसिस, ब्रेन ट्यूमर, मेंदूवरील शस्त्रक्रिया / पक्षघाताने आजारी कर्मचारी, निश्चेतनावस्था (कोमा), मनोविकृतीने ग्रस्त (मनोविकार), थॅलेसिमा विकारग्रस्त मुलांचे पालक

२) दिव्यांग
३) महिला / विधवा / परित्यक्त्या / घटस्फोटित
४) पती-पत्नी एकत्रीकरण : केंद्र राज्य, शासकीय / निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती / मंडळ / महामंडळ / नगरपालिका / महानगरपालिका अथवा शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये तसेच केंद्र किंवा राज्य शासनांतर्गत कार्यरत स्वायत्त संस्थामधील कार्यरत पती-पत्नी.
५) अंतर लांब

तसेच बदली करावयाची झाल्यास सदर कर्मचाऱ्यांची किमान ८ वर्षे त्या पदावर त्या जिल्ह्यात सेवा पूर्ण होणे आवश्यक असून, बदली दिलेल्या कर्मचाऱ्याची सेवा ही बदलीच्या जिल्ह्यात नव नियुक्ती म्हणून ग्राह्य धरण्यात यावी. ज्या ठिकाणी बदली हवी आहे त्या ठिकाणी पद रिक्त असणे आवश्यक असावे. कार्यरत पद बदलण्यात येऊ नये. प्रशासकीय कारणास्तव व विनंतीनुसार बदली अनुज्ञेय असणार आहे. याबाबत सविस्तर करार कर्मचाऱ्यांचे बदली धोरण (Contract Employees Transfer Policy) निश्चित करण्यात आलेले आहे.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन, आदेश निर्गमित

अधिक माहितीसाठी : बदली धोरण परिपत्रक पाहा

राज्यातील या करार कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा शासन निर्णय निर्गमित; या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम

गुड न्यूज! राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, शासन परिपत्रक जारी

Leave a Comment