Contract Employees Permanent : ठाणे महानगरपालिकेमधील समाज विकास विभागामध्ये 11 महिन्यांच्या करारानुसार कंत्राटी पद्धतीने गेल्या 8 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासंदर्भात मा. खासदार Naresh Mhaske यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे.
गेली अनेक वर्षं ठाणे महानगरपालिकेमध्ये समाज विकास विभागामध्ये 24 पर्यवेक्षक कंत्राटी पद्धतीने काम करत होते. या काळात पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना महानगरपालिकेच्या अनेक योजना राबवण्यात व त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
कर्मचाऱ्यांना मानधन, कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय
हे कर्मचारी नेहमी 11 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट करून मानधन स्वरूपावर गेली 8 वर्ष काम करत होते. मध्यंतरीच्या काळात यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. परंतु मा. खासदार नरेश म्हसके यांनी यासंदर्भात सतत शासनाकडे व महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला, आणि या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, या 24 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी (Contract Employees Permanent) मिळाली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा – पाहा अपडेट
मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आयुक्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील या 24 कर्मचाऱ्यांसाठी खूप प्रयत्न केले होते. दि. 27 जुलै रोजी या सर्वांनी मा. खासदार नरेश म्हसके यांची प्रत्यक्षात भेटून माझा सत्कार केला व आभार मानले. असे एक्स वर मा. खासदार Naresh Mhaske यांनी ट्वीट केले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा