मराठा समाजासाठी नव्याने लागू झालेल्या SEBC आरक्षणातून अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. परंतु मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्याने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत होता. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा (Caste Validity Certificate Time Submission Extension) मोठा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत (Caste Validity Certificate Time Submission Extension) मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!
या वैधता प्रमाणपत्रा अभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचण येऊ नये यासाठी SEBC प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रातून सूट देणेबाबत मा विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी गेल्या आठवड्यात मा श्री देवेंद्रजी फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे विनंती केली होती.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार
सदर विनंतीनुसार मराठा समाजातील तरुणांची मागणी शासनाने गांभीर्याने विचारात घेतली व शासनाने मराठा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे – जाणून घ्या सविस्तर

या निर्णयाने अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या दूर होऊन प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ वाचणार आहे.
या मागणीची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजातील तरुणांना दिलासा दिल्याबद्दल मा. अभिमन्यु पवार विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे, मा श्री देवेंद्रजी फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा