Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय!

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठक दिनांक 16 जानेवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यास राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? तारीख पहा

राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात. या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात.

राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

ज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुमारे ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात आपण ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या घटनांबाबत मंत्री परिषदेत चर्चा झाली. केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने घेतले आहेत. सकृतदर्शनी हे प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहेत.

त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. यावर अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क रहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच अशाच प्रकारच्या घटना वर्धा येथे आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयास मौजे सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथील जमीन निःशुल्क उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित ५० रूग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास ४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग, नवी दिल्ली यांच्या मानकांनुसार मौजे सांगाव येथे या होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी पुरेशी, सलग व सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पिंपळगाव खुर्द ( ता. कागल) येथील गट क्र.४८७ मधील गायरान जमीनीपैकी ५.७५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Comment