BMC Health Department Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू आहे.
तुम्ही डॉक्टर किंवा आरोग्य सेवा व्यावसायिक आहात? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Health Department Recruitment) त्यांच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
एकूण किती जागा?
एकूण १३७ जागांसाठी ही भरती होत आहे. सविस्तर तपशील खालीलप्रमाणे
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती
कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे?
- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) एकूण 83 जागा
- पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Medical Officer) – (Anesthesiology, General Medicine, General Surgery, Microbiology, Obstetrics, Gynecology, Orthopedics, Paediatrics, Pathology) एकूण 43 जागा
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Radiology) एकूण 05 जागा
- भौतिकोपचार तज्ञ (Physiotherapist) एकूण 06 जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध
सरकारी नोकरीची संधी! DBSKKV अंतर्गत 249 जागांसाठी जाहिरात
अर्ज कधी आणि कुठे करायचा?
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ फेब्रुवारी २०२५
- अर्ज कुठे करायचा: प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०
अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क: ₹८३८ (₹७१० + ₹१२८ जीएसटी)
महत्वाच्या गोष्टी
- अर्ज २८ जानेवारी २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.
- वैद्यकीय पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे आहे.
- भौतिकोपचार तज्ञ पदासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे.
कोण अर्ज करू शकतो?
या संदर्भात अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या BMC च्या जाहिरातीत दिली आहे. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अधिक माहिती : https://portal.mcgm.gov.in/

BMC #Mumbai #MedicalJobs #Healthcare #Jobs #Maharashtra #Naukri #वैद्यकीय_नोकरी #मुंबई #महाराष्ट्र