AsmitaBhavan Project
AsmitaBhavan Project : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. बाजारपेठ असलेल्या तालुक्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या भवनांमुळे ‘माविम’च्या महिला बचतगटांना व्यवसायासाठी अधिक संधी उपलब्ध होतील.
महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडली. यामध्ये रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे मुद्दे आणि १०० दिवस कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लड्डा आदी अधिकारी उपस्थित होते.
🔹 श्रीवर्धन येथे ‘सोलार फिश ड्राईंग’ प्रकल्प:
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे ‘नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प’ राबविण्यात येणार असून, शेती, शेतीपूरक आणि बिगरशेती व्यवसायांना चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!
🔹 रोहा येथे गारमेंट प्रकल्प:
शहर आणि ग्रामीण भागात हा प्रकल्प विस्तारला जावा, यासाठी महिलांना प्रशिक्षण आणि योग्य मानधन देण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवावी, तसेच जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा, असे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.
‘माविम’ अंतर्गत बचतगटांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश मंत्री महोदयांनी दिले. ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी अधिक संधी मिळाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
तुम्हाला किती टॅक्स बसेल? जुना आणि नवा दोन्ही पद्धतीने तपासा एक क्लीकवर
🔹 राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार.
🔹 राज्यस्तरीय ‘बाल महोत्सव’ आयोजित करून साहित्यविषयक प्रतिभा असलेल्या बालकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार.
🔹 बालगृह आणि निरीक्षणगृहातील मुलांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार.
💠 एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषण आहार, ग्रोथ मॉनिटरींग, गृहभेटीद्वारे मार्गदर्शन आणि पोषण जनजागृती कार्यक्रम राबवले जातील.
💠 ‘लाडकी बहीण योजना’, ‘पिंक रिक्षा’, ‘जीवन ज्योती विमा योजना’, ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बालकांच्या कल्याणासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी पुढील टप्प्यात आणखी प्रभावी धोरणे राबवणार आहे.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…