उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा सत्कार – ASHA Volunteers and Group Promoters

ASHA Volunteers and Group Promoters : राज्यातील ग्रामीण भागात आरोग्याच्या विविध सेवासुविधा पोहोचविण्याचे काम आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांकडून होत आहे. घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधून जनजागृती करण्याचे कामही या महिला करीत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हास्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकामध्ये भाग्यरथा शिवाजी शिखरे, भांडेगाव, अनिता अशोक जळके, भांडेगाव, वंदना गजानन लेकुळे, पिंपळदरी तसेच जिल्हास्तरीय गटप्रवर्तकांमध्ये दिपिका दिपक देशपांडे नर्सी नामदेव, रेणुका दिवाकर देशपांडे आखाडा बाळापूर, दिपाली ओंकार पडोळे टेंभूर्णी, संगीता विठ्ठल जगताप कवठा, ज्योती बाजीराव कहाते जवळा बाजार यांचा मान्यवरांच्याहस्ते स्मृतीचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला! चेक करा

तसेच तालुकास्तरीय आशा स्वयंसेविकामध्ये सोनाली दत्तराव खंदारे, मणकर्णा कानबाराव खुडे, वैशाली गणेश ढगे, निता भारत गायकवाड, मीराबाई परसराम पोटे, प्रेमिला गजानन रणखांब, प्रणाली प्रल्हाद खिल्लारे, श्रीवंता उत्तमराव बर्गे, नीता प्रदीप जयस्वाल, मुक्ता शेकुराव खुडे, मनिषा रमेश पंडीत, संघप्रिया निशीकांत नरवाडे, सुचिता शामराव पांडे, सीमा रेणुकादास पांडे, नयना संतोष बेंगाळ यांचाही उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, आरोग्य अधिकारी सतीश रूणवाल, अनिता चव्हाण, श्रीमती वडकुते, शंकरराव तावडे, आशा प्रशिक्षक मारोती एंगडे, अजहर अली सय्यद, डॉ सुनील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक (ASHA volunteers and group promoters) आरोग्याच्या सेवासुविधा पोहचवत आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळत असून विविध प्रकारचे सर्वेक्षण, विविध प्रकारचे लसीकरण यासाठी या महिला नेहमीच अग्रेसर आ- हेत. त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यांचे कार्य असेच अविरत चालू ठेवतील अशी अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या कामाचे कौतुक केले.

आशा सेविकांसाठी : HealthGuru IICARE YouTube Channel

Leave a Comment