ASHA Group Promoter Remuneration : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा जानेवारी महिन्याचा मोबदला राज्य शासनाने मंजूर केला आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे. (GR PDF लिंक खाली दिलेली आहे)
आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय!
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दिनांक १४/०३/२०२४ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात अनुक्रमे रु.५०००/- व रु.१०००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? तारीख पाहा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी महिन्याचा मोबदला देण्याचा शासन निर्णय निर्गमित
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ३२८६७.९९ लक्ष व सन २०२४-२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रु.८५४०८.४६ लक्ष असे एकुण रु.११८२७६.४५ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून यापूर्वी माहे ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ चे मानधन अदा करण्यासाठी वितरीत करण्यात आलेले आहे.
आशा स्वयंसेविकांसाठी यूट्यूब चॅनेल जॉइन करा
आता, उर्वरित अनुदानातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी २०२५ या १ महिन्याच्या कालावधीची रक्कम रु.८२७२.३१ लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या जानेवारी महिन्याचे वाढीव मानधन शासन निर्णय येथे पहा