Aser Report 2024 Maharashtra : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने ग्रामीण शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा असर (Annual Status of Education Report – ASER) 2024 अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या स्थितीबाबत विविध मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे निष्कर्ष
संगणक व डिजिटल शिक्षण
➡ २०.४% विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे नमूद.
➡ प्रत्यक्षात राज्यातील ७२.९५% शाळांमध्ये संगणक उपलब्ध.
➡ ९४.२% विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन असून, ६३.३% विद्यार्थी शिक्षणासाठी त्याचा वापर करतात.
शैक्षणिक प्रगती
➡ ६ ते १४ वयोगटातील ६०.९% विद्यार्थी शासकीय आणि ३८.५% विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
➡ शासकीय शाळांमधील वाचन प्रगती १०.९%, तर खाजगी शाळांमध्ये ८.१% वाढ.
➡ गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये १३.१% आणि खाजगी शाळांमध्ये ११.५% प्रगती.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेख
🔹 इयत्ता तिसरीतील वाचन स्तर देशाच्या तुलनेत १०% अधिक.
🔹 गणितीय कौशल्यात महाराष्ट्र देशातील टॉप ५ राज्यांमध्ये.
🔹 १५-१६ वयोगटातील ९८% विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत.
🔹 महाराष्ट्रातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त ०.४%, जे देशाच्या सरासरीपेक्षा कमी (१.९%) आहे.
शालेय शिक्षण विभागाचा नवीन निर्णय
महामारीनंतर शिक्षणातील सुधारणा
🔹 पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी २०२४ मध्ये ९५% मुले नोंदणीकृत, २०२२ मध्ये हे प्रमाण ९३.९% होते.
🔹 २०१८ मध्ये ९९.२% पटनोंदणी होती, जी २०२४ मध्येही ९९.६% वर स्थिर आहे.
असर (Annual Status of Education Report – ASER) 2024 अहवाल PDF येथे पाहा
पूर्ण अहवाल व अधिक माहिती मिळवा: www.asercentre.org
सरकारी नोकरीची संधी! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती!