Anganwadi Sevika Training Program : महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीस यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम (Food Safety and Standards Authority of India) आयोजित करण्यात आला आहे.
अंगणवाडी केंद्रांच्या कर्मचाऱ्यांमध्ये व लाभार्थ्यांमध्ये पोषण आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडावा यासाठी अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते दि 1 ऑगस्ट रोजी (दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे) करण्यात आले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा
राज्यातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 25 हजार अंगणवाडी केंद्रातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (Anganwadi Sevika Training Program)
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते ‘ यशस्विनी डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ आणि ‘स्त्रीशक्ती डिजिटल प्लॅटफॉर्म‘ चे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
कोकण विभागांमध्ये महात्मा गांधी प्रशिक्षण संस्थेतर्फे मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका पोषण मापदंड प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, महिला व बाल विकास आयुक्त कैलाश पगारे ऐकात्मिक बाल विकास सेवा योजना व विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उप आयुक्त महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे या उपस्थित होत्या यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार
राज्यातील ‘या’ महिलांसाठी मोठी भेट! दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा