Anganwadi Sevika Madatnis Salary : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारकडून निधी वेळेवर न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमितपणे देणे शक्य नव्हते.
त्यामुळे 2 जून 2017 रोजी झालेल्या बैठकीत, अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम, अपेक्षित केंद्रीय सहाय्य मिळाले नसले तरी खर्च करण्यास विभागाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिनांक 31 जानेवारी २०२५ रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जानेवारी या महिन्याचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता (Anganwadi Sevika Madatnis Salary) देण्यासाठी एकूण २३९.०८ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची नवीन नियमावली
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नवीन नियम
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख दरवर्षी ३० एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.
- ज्या कर्मचाऱ्यांचा जन्म १ जानेवारी ते १ मे दरम्यान असेल, ते त्याच वर्षी ३० एप्रिलला सेवानिवृत्त होतील.
- ज्या कर्मचाऱ्यांचा जन्म २ मे ते ३१ डिसेंबर दरम्यान असेल, ते पुढील वर्षी ३० एप्रिलला सेवानिवृत्त होतील.
उदाहरण
- एखाद्या अंगणवाडी सेविकेचा जन्म १५ एप्रिल २०२४ रोजी असेल, तर ते ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त होईल.
- एखाद्या अंगणवाडी मदतनीसचा जन्म १५ जुलै २०२४ रोजी असेल, तर ते ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक माहिती पाहा