Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाडयांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.

सुधारित अटी व शर्ती नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळसेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ नुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुधारित गुणांकन शैक्षणिक अहर्ता तपशील खालीलप्रमाणे

अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक माहिती पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या दिनांक ०२.०२.२०२३ व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील.

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळसेवेने पदभरतीस शासन पत्र दिनांक ०९,०९.२०२४ अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दिनांक 30/01/2025 रोजीचा शासन निर्णय

अंगणवाडी भरती सुधारित शासन निर्णय येथे पाहा

दिनांक 13/12 /2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करणेबाबत.

दिनांक 11/08/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

दिनांक 02/05/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

दिनांक 02/02/2023 रोजीचा शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत.

Leave a Comment