अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

Anganwadi Salary : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर, २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यात आला आहे.

या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.

केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या

राज्यातील अंगणवाडी संदर्भात 2 महत्वाचे शासन निर्णय जारी

त्यानुसार आता अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika)अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर (Nov 2024) या महिन्याचे मानधन (Salary) व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता एकूण रुपये २३८.९८ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे आता माहे नोव्हेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांना वेळेत मिळणार आहे.

राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ! परिपत्रक

शासन निर्णय येथे पाहा

आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना ‘सानुग्रह अनुदान’ निधी मंजूर, या तारखेपासून मिळणार लाभ!

Leave a Comment