अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती मिळणार Anganwadi Emplyoee

Anganwadi Emplyoee  : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे महिला व बालविकास विभागाचा पदभार स्विकारला, यावेळी त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा योजना (Insurance Scheme) लागू करण्यास मान्यता दिली असून, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका (Supervisor) पदावर नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही सुरू करणार असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा.

Aditi Tatkare

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘या’ विमा योजना लागू

Anganwadi Emplyoee Insurance Scheme : महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) व ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्याकरिता केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के हिस्सा असणार आहे. या योजनेकरिता पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती मिळणार

Anganwadi workers : अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका (Supervisor) या पदावर निवडीने नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही कु. तटकरे यांनी सांगितले. ग्राम बालविकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता नागरी बालविकास केंद्र (UCDC) लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

महत्वाचे अपडेट्स : राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार

महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार

Anganwadi Emplyoee
                                                                 Anganwadi Emplyoee

राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार, असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केले आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात – शासन निर्णय येथे पाहा

त्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास (Women and Child Development Department) आयुक्त प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे (Kailas Pagare) संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट! ‘पोषण ट्रॅकर ऍप’ मध्ये हा मोठा बदल! येथे पाहा

Leave a Comment